पनवेल ः रामप्रहर वृत्त
खालापूर तालुक्यातील चौक, लोधिवली, आसरे व तुपगाव या चार ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या रविवारी असून भाजप बाळासाहेबांची शिवसेना, मनसे व रिपाई (आठवले गट) या परिवर्तन आघाडी अर्थात युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 13) सायंकाळी 5 वाजता भव्य जाहीर सभा चौक येथे होणार आहे. या सभेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार देवेंद्र साटम, आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड, शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले, भाजपचे तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.