Breaking News

कलाकार पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे भूमिपूजन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 51 लाखांची मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कलाकार पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि. 28) खांदा कॉलनी येथे उत्साहात झाला. याकरिता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपण 51 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर केले.
या सोहळ्यास आमदार मंदा म्हात्रे, शिवसेनेचे विजय नाहटा, भाजपचे नरेंद्र पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कलाकार, पत्रकारांना शुभेच्छा देताना त्यांना हक्काचे घर मिळायलाच हवे यासाठी मी 51 लाख रुपयांची मदत करणार, अशी घोषणा केली, तर महेंद्र घरत यांनी 12 लाख रुपये मदत करणार असल्याचे आपल्या भाषणादरम्यान सांगितले.
कलाकार व पत्रकारांचा समावेश असलेल्या संस्थेला सिडकोमार्फत खांदा कॉलनीत भूखंड प्राप्त झाला आहे. या संस्थेत 60पेक्षा अधिक कलाकार व पत्रकार सदस्य आहेत. भूखंड खरेदी व बांधकाम प्रक्रियेतील तांत्रिक आणि आर्थिक पूर्तता पूर्ण झाल्या आहेत. या पूर्ततेनंतर भूमिपूजन, नामफलक अनावरण, बांधकाम शुभारंभ सोहळा झाला. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते, वैधानिक पदावरील पदाधिकारी, सिने-नाट्य कलाकार उपस्थित होते.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply