Breaking News

उमेदवारांच्या समर्थनार्थ चौकमध्ये आज जाहीर सभा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

खालापूर तालुक्यातील चौक, लोधिवली, आसरे व तुपगाव या चार ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या रविवारी असून भाजप  बाळासाहेबांची शिवसेना, मनसे व रिपाई (आठवले गट) या परिवर्तन आघाडी अर्थात युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 13) सायंकाळी 5 वाजता भव्य जाहीर सभा चौक येथे होणार आहे. या सभेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार देवेंद्र साटम, आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड, शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले, भाजपचे तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply