Breaking News

शेकापला गळती, भाजपमध्ये भरती!, वाजे, चेरवली, बापदेववाडीतील कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील वाजे, चेरवली आणि बापदेववाडीतील शेकापच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले.

पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पक्ष मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, तसेच भारत पाटील, राजेंद्र कालेकर, रामदास हंबीर आदी उपस्थित होते.

या वेळी वाजे ग्रामपंचायतीचे सदस्य राजू हंबीर, बापदेववाडीतील दिलीप पाटील, स्वप्नील पाटील, चेरवली येथील सोमा हिंदोळे, सुरेश झुगरे, बाळाराम हिंदोळे, किसन झुगरे, अनंता हिंदोळे, पिंट्या ढुमणे, जोमा भस्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर

प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रभाग 20मधील कार्यकर्त्यांचीही विकासाला साथ

पनवेल : पनवेल परिसराचा सर्वांगीण व शाश्वत विकास भाजपच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूरच करू शकतात याची खात्री पटल्याने महापालिका प्रभाग क्रमांक 20मधील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 5) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply