पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा निधी तसेच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे आसुडगावमध्ये (प्रभाग क्रमांक 9) महापालिकेमार्फत होणार्या विकासकामांचा शुभारंभ सोहळा शनिवारी (दि. 15) आयोजित करण्यात आला होता. या विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, महापालिका झाल्यामुळे एक मोठी ताकद या परिसराला मिळाली आहे, असे प्रतिपादन केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासाची अनेक कामे सातत्याने मार्गी लागत आहेत. त्यांच्या आमदार निधीमधून आसुडगाव येथे बांधण्यात आलेल्या ओपन जिम आणि हायमास्टचे लोकार्पण तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेमार्फत बांधण्यात येणारे नवीन समाजमंदिर, रस्ते काँक्रीटीकरण, पाण्याची नवीन लाईन, ड्रेेनेज लाईन या कामांचे भूमिपूजन आणि पाण्याच्या टाकीच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण शनिवारी झाले.
या समारंभास माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शशिकांत शेळके, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शांताराम महाडिक, गोपीनाथ मुंडे, प्रवीण भोसले, संजय कांबळे, रमेशबुवा नाईक, बालम नाईक, मनोहर म्हात्रे, श्री. खंडागळे, मनोहर गायकवाड, किशोर कांबळे, विनोद अडसूळ, निलेश पाटील, स्वप्नील गायकवाड, मनीषा पाटील, विद्या यादव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, या वेळी भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांना आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह इतरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …