Breaking News

चिरनेरच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरला अजगर

उरण : रामप्रहर वृत्त  – चिरनेर येथील सूर्यकांत म्हात्रे यांच्या फार्महाऊसवर असणार्‍या पोल्ट्री फार्ममध्ये शिरलेल्या एका अजगराला सर्पमित्र विवेक केणी आणि महेश भोईर यांनी पकडून त्याला इंद्रायणीच्या डोंगरात सोडून दिले.

पत्रकार सूर्यकांत म्हात्रे यांचे चिरनेर गावात पोल्ट्री फार्म आहे. आज सकाळी ते पोल्ट्री फार्ममध्ये गेले असता त्यांना एक अजस्त्र अजगर असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ सर्पमित्र पत्रकार महेश भोईर यांना कॉल करून पोल्ट्रीमध्ये अजगर असल्याची कल्पना दिली. महेश भोईर हे काही मिनिटांत त्यांचे सहकारी सर्पमित्र विवेक केणी यांना घेऊन म्हात्रे यांच्या पोल्ट्रीवर दाखल झाले. सुमारे 7 फूट लांबी असलेला अजगर त्यांनी पकडला. हा अजगर किमान 4 ते 5 वर्षाचा असून तो अन्नाच्या शोधात पोल्ट्रीत आला असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. त्यांनी या अजगराला पकडून इंद्रायणीच्या डोंगरात नेऊन सोडले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply