पनवेलच्या कल्पतरू सोसायटी उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधार कार्डची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पनवेल शहरातील कल्पतरू सोसायटीत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी शिबिराचे आयोजन शनिवारी (दि. 15) करण्यात आले होते.
या वेळी माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजप प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भार्गव ठाकूर, कल्पतरू सोसायटीचे चेअरमन प्रशांत बाळाराम ठाकूर, पनीर सेल्वम, मनोज आंग्रे, यांच्यासह पदाधिकारी आणि सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते.