Breaking News

खांदा कॉलनीतील सोसायट्यांच्या दिशादर्शक नामफलकाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनी सेक्टर 7 येथे सोसायट्यांच्या दिशादर्शक नाम फलकाचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, भाजप खांदा कॉलनी अध्यक्ष व माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य व ज्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भिमराव पोवार, कामगार नेते मोतीलाल कोळी, भाजपचे खांदा कॉलनी माजी अध्यक्ष गोपीनाथ मुंडे आणि खांदा कॉलनी येथील सेक्टर 7 एकता रहिवासी संघ यांनी पुढाकार घेऊन या दिशादर्शक नामफलकासाठी प्रयत्न केले. नामफलकाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी तेथील सर्व रहिवासी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply