Breaking News

महिला आणि दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप : बांधपाडा ग्रामपंचायतीचा उपक्रम

उरण : बातमीदार, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या 15वा वित्त आयोग व महिला बालकल्याण-दिव्यांग सेस निधीतून 62 दिव्यांगांना सोलर यूपीएस मशीनसह तीन एलईडी बल्प तसेच 50 महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी थेट सरपंचपदी विराजमान झालेल्या सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर आणि उपसरपंच सुजित भालचंद्र म्हात्रे आणि विद्यमान दहा सदस्यांच्या टीमच्या माध्यमातून कोरोना काळात ग्रामस्थांच्या आरोग्याला प्राधान्य देत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, कोरोना प्रतिबंधक किट, गावात सॅनिटायझर फवारणी, लसीचा एक डोस, अशा सर्वोतोपरी सुविधा देण्यात आले. पर्यावरणाचा र्‍हास टाळण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण मोहिमेंतर्गत आंबा काजू नारळाची झाडे लावण्यात आली. घरोघरी कचराकुंडी वाटप आणि शाळेच्या नवीन वास्तुसाठी निधी मिळविण्याचे कार्य करून उर्वरित कार्यकाळात ग्रामपंचायतीतर्फे गावासाठी रुग्णवाहिका आणि घंटागाडी देण्याचे अभिवचन देण्यात आले. ग्रामपंचायत खोपटेतर्फे आयोजित या कार्यक्रमात सरपंच विशाखा ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे यांच्या समवेत भावना पाटील, राजश्री पाटील, देवानंद पाटील, शुभांगी ठाकूर, रितेश ठाकूर, अच्युत ठाकूर, मीनाक्षी म्हात्रे, करिष्मा म्हात्रे, संदेश म्हात्रे, जागृती घरत या ग्रामपंचायत सदस्यांसंमवेत ग्रामविकास अधिकारी रूपम गावंड, गाव कमिटी अध्यक्ष विश्वनाथ पाटील,उपाध्यक्ष कमलाकर म्हात्रे, सचिव कुमार ठाकूर, पाणी कमिटी अध्यक्ष महेंद्र पाटील, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष प्रमोद ठाकूर, राजेंद्र म्हात्रे, यशवंत ठाकूर, संतोष पाटील, निलेश भगत असे पाडा अध्यक्ष तथा महिला बचत गट पदाधिकारी व सीआरपी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील वर्तक यांनी तर प्रास्ताविक करून आभार देवानंद पाटील यांनी मानले. कार्यक्रासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी, दिव्यांग प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply