Breaking News

पनवेलमध्ये पथविक्रेत्यांची पहिली यादी जाहीर

मनपा शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत 3076 जणांना मान्यता

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार फेरीवाला धोरणांतर्गत पनवेल महापालिका शहर फेरीवाला समितीची बैठक मंगळवारी (दि. 1) झाली. या वेळी सर्वानुमते 3076 पथविक्रेत्यांची पहिली यादी अंतिम करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानाद्वारे फेरीवाल्यांना सहाय्य या घटकामध्ये फेरीवाला धोरणांतर्गत मंगळवारी शहर फेरीवाला समितीची  बैठक आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयात घेण्यात आली.  या वेळी उपायुक्त कैलास गावडे, दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय कादबाने, वाहतूक शाखेचे संजय नाले व शहर फेरीवाला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. नागरिकांनी दिलेल्या हरकती व सुचनांवरती या वेळी चर्चा झाली. फेरीवाल्यांसाठी बाजारपेठांचा विकास करणे, स्थिर फेरीवाल्यांसाठी जागेची निश्चिती करणे अशा विविध विषयांवरती या वेळी चर्चा करण्यात येऊन सर्वानुमते पहिली 3076 पथविक्रेत्यांची यादी या वेळी अंतिम करण्यात आली. फेरीवाला सहाय्य अभियानांतर्गत शहरातील फेरीवाल्याच्या विविध गरजा व समस्या सोडविण्यासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील शहर फेरीवाल्यांची यादी अंतिम झाल्यावर त्यांना सोयी सुविधा देणे सोपे होणार आहे. यामध्ये शहर फेरीवाला समितीचे मोठे योगदान असणार आहे. महापालिकेच्या वतीने येत्या काही महिन्यांमध्ये  सुसज्ज असे दैनंदिन मार्केट बांधले जाणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी या वेळी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply