धरमशाला : वृत्तसंस्था
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 12)धरमशाला येथे होणार होता, मात्र सतत पडणार्या पावसामुळे अखेर एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करण्यात आला.
धरमशाला येथे दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होणार होता, पण पाऊस आणि ओली खेळपट्टी यामुळे सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. आधी ओली खेळपट्टी आणि 2.30 नंतर पाऊस अशा दुहेरी कारणामुळे अखेर 5.30च्या सुमारास सामना रद्द करण्याचा निर्णय सामनाधिकार्यांनी घेतला.
गेल्या वर्षा याच मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …