Breaking News

करंजाडेत भाजपची भव्य प्रचार रॅली

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त
करंजाडे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन पॅनलचा जोरदार प्रचार करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करंजाडेमध्ये रविवारी (दि. 11) भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपकडून थेट सरपंचपदासाठी मंगेश शेलार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1मधून सुरज शेलार, देवकु वाघे, प्रभाग 2मधून नंदकुमार भोईर, प्रीती शहारे, बिपीन गायकवाड, प्रभाग 3मधून सागर आंग्रे, शिल्पा नागे अनिता भोईर, प्रभाग 4मधून आतिष साबळे, अर्चना धामणस्कर व प्रिया फडके उभे राहिले आहेत.
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ करंजाडेमध्ये पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
करंजाडे गावातून रॅलीस सुरुवात झाली. सेक्टर 1, 3, 5, 6 तसेच कोळीवाडा, बौद्धवाडा, गणेशनगर आणि सेक्टर 4 परिसरात रॅली फिरली. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह समाजाच्या विविध घटकांतील नागरिक उत्स्फूर्तपणे या रॅलीत सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. या वेळी भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply