Breaking News

आमदार चषकाचा वडवली संघ मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील तोंडरे येथे पाटील इलेव्हन संघाच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक स्पर्धेचे विजेतेपद टावर ग्रुप अमृत 11 वडवली ब संघाने पटकाविले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम एक लाख आणि आमदार चषक देऊन सोमवारी (दि. 11) गौरविण्यात आले.
तोंडरे येथील आझाद मैदानात पाच दिवस आमदार चषक क्रिकेट स्पर्धा रंगली.  या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, स्पर्धेचे आयोजक तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व तालुका उपाध्यक्ष राम पाटील, सरपंच नारायण पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, बुर्दूल सरपंच चिंतामण पाटील, राजू कडू, पवन भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. दरम्यान, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही या स्पर्धेला भेट देत शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत स्व. रामचंद्र मढवी प्रतिष्ठान उसाटणे यांनी द्वितीय, जय अंबिका जय हनुमान संघ जोवेली तृतीय आणि स्व. रोहन स्पोर्ट्स यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. त्यांना रोख रक्कम आणि चषक देण्यात आला. मालिकावीर अजय कडू (वडवली), उत्कृष्ट फलंदाज विशाल पाटील (वडवली), उत्कृष्ट गोलंदाज धनंजय हिलाल (उसाटणे), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक महेंद्र धुळे (जोवेली) आणि अंतिम लढतीचा सामनावीर ऋतिक पाटिल (वडवली) ठरला. त्यांनाही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply