Breaking News

खारघरच्या आणखी एका विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार

खारघर येथील श्री सत्य साई हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन ट्रस्ट, सेक्टर 38 या रुग्णालयाचे विलगीकरण कक्ष म्हणून निवड करण्यात आल्याने त्यासाठी उच्च दाब वीजपुरवठा सुरु करण्याचे काम एका आठवड्यात  युद्धपातळीवर रविवारी (दि. 12) पूर्ण करण्यात आले. या इमारतीत 500 केडब्लूचे  वीजभार  सुरु

करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात, महावितरणवर अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच  विलगीकरण कक्षाच्या विद्युतीकरणाची महत्वाची जबाबदारी आहे. महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत मुलुंड, खारघर, पनवेल ग्रामीण व पनवेल शहर विभागात विलगीकरण कक्ष म्हणून सरकारने निवडलेल्या इमारतींचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचे काम आहे. खारघर सेक्टर 38 येथील श्री सत्य साई हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन ट्रस्ट, या रुग्णालयाची  विलगीकरण कक्ष म्हणून निवड करण्यात आल्याने या विलगीकरण कक्षासाठी  उच्च दाब वीजपुरवठा सुरु करणे आवश्यक होते. वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता आर. बी. माने, तसेच उपकार्यकारी अभियंता चक्रवर्ती यांचे निर्देशानुसार, सिडकोने त्यांचे प्रलंबित काम  एका आठवड्यात पूर्ण केले. सर्व तांत्रिकबाबी पूर्ण झाल्यानंतर पनवेल शहर विभागाचे  कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांचे देखरेखीखाली, अतिरीक्त कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील, शाखा अभियंता शकील अहमद व त्या शाखेतील  जनमित्र यांनी या काम एका आठवड्यात युद्धपातळीवर रविवारी पूर्ण केले. या इमारतीत 500 केडब्लूचे  वीजभार  सुरु करण्यात आला आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील, सहाय्यक अभियंता  निलाखे, शाखा अभियंता शकील अहमद व त्यांचे कर्मचारी, सिडकोचे अभियंता कुरकुरे, चाचणी विभाग वाशी येथील उपकार्यकारी अभियंता समशेट्टे, सहाय्यक अभियंता शिवाजी पाटील यांनी काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply