अलिबाग : प्रतिनिधी
खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फूडमॉल पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधून एक कोटी 44 लाख किमतीची सोन्याची बिस्कीटे चोरणार्या आरोपीच्या मध्यप्रदेशातील घरातून रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) एक कोटी 42 लाख 25 हजार 942 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, मात्र आरोप पप्पू बाबू खान मुलतानी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाध घार्गे यांनी ही माहिती शुक्रवारी (दि. 16) पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अपर पोली अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे या वेळी उपस्थित होते. सोन्या-चांदीचे घाऊक व्यापारी चौधरी 7 डिसेंबर रोजी हैदराबादहून मुंबईकडे प्रवास करीत होते. त्यांची गाडी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फूडमॉल पार्किंगमध्ये उभी होती. त्यातून सात किलो 2.732 ग्राम वजनाचे सोने चोरीला गेले होते. त्याची किंमत एक कोटी 44 लाख होती. चौधरी यांनी याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपीच्या फोटोच्या सहाय्याने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अशाप्रकारे गुन्हे करणारे आरोपी हे मध्य प्रदेशमधील खैरवा ता. मनावर, जि. धार येथील असल्याची माहिती मिळाली. 11 डिसेंबर रोजी पोलिसांनी पप्पू बाबू खान मुलतानीच्या घरावर छापा मारला, पण घरझडतीत काही सापडले नाही. त्याच गावात राहणारा पप्पूचा भाऊ इस्माईल बाबू खान याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर खोपोली येथील ती चोरी त्याचा भाऊ पप्पू खान यानेच केल्याचे सांगून चोरलेले दागिने आपल्याकडे ठेवण्यास दिल्याची कबुली दिली. 2.664 कि.गॅ्र. म्हणजे एक कोटी 42 लाख 25 हजार 942 रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे आणि दागिने पोलिसांनी हस्तगत केली, मात्र आरोपी पप्पू बाबू खान मुलतानी पोलिसांच्या हाती लागला नाही. तो फरार आहे. पोलीस आरोपी पप्पू बाबू खान मुलतानी व त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाध घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे सहाय्याक पोलीस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार दीपक मोरे, देवराम कोरम, पोलीस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे , अमोल हंबीर, प्रतिक सावंत, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे यांनी ही कामगिरी केली. एलसीबीचे पोलीस हवालदार राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …