Breaking News

शासनाच्या आरोग्य यंत्रणेस खासगी वैद्यकीय संघटनांची साथ

म्हसळा ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यात राज्य शासनाचा आरोग्य व्यवस्थेतील ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य व्यवस्थेतील म्हसळा, मेंदडी व खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाभरे येथील एक जि. प. दवाखाना सक्रिय आहे. आता तालुक्यातील खासगी वैद्यकीय संघटनांनी शासनाच्या आरोग्य यंत्रणेसमवेत काम करण्याचे जाहीर केले आहे. शासनाला त्याबाबत कळविल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल मुईज शेख यांनी सांगितले. म्हसळा शहरात नोडल ऑफीसर म्हणून मुख्याधिकारी म्हसळा नगरपंचायत, तालुक्यातील ग्रामीण भागात नोडल ऑफीसर म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय. एन. प्रभे काम करीत आहेत. ग्रामीण रुग्णालय म्हसळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मेहता व ता. आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे यांनी म्हसळा तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नसल्याचे सांगितले. भविष्यात कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्वसामान्य लक्षणे दिसल्यास रुग्णाला नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्याबाबत बंधनकारक असल्याचे पत्र तालुक्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे यांनी दिले आहे.

भविष्यात कोरोना नियंत्रणासाठी सर्वसामान्य लक्षणे दिसत असल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी म्हसळ्यातील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेतील म्हसळा, मेंदडी व खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. आम्ही तालुक्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक शासकीय आरोग्य यंत्रणेसोबत राहू.

-डॉ. अब्दुल मोईज शेख, अध्यक्ष, म्हसळा तालुका

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply