रेवदंडा : प्रतिनिधी
चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्त मंदिरात गाभार्यातील 24 लाख किमतीचा 40 किलो वजनाचा चांदीचे भिंतीवरील नक्षीकाम अज्ञात चोरट्याने गुरुवारी मध्यरात्रीचे सुमारास चारून नेले आहे.
नुकतीच चौल भोवाळे श्री दत्त यात्रा उत्साहात झाली. यात्रेच्या निमित्ताने दत्तजयंतीच्या दिवशी मंदिराच्या गाभार्याचे भिंतीवर नक्षीकाम केलेली चांदीच्या पत्राची सजावट केली जाते, तर श्री दत्त मुखवटा पालखीसह चौल पाचकळशी माळी समाजाचे वतीने बसविण्यात येतो. श्री दत्त यात्रेच्या समाप्तीनंतर श्री दत्त मुखवटा काढण्यात येतो, परंतु भिंतीवर असलेली नक्षीकाम केलेल्या चांदीचा पत्रा काढण्यात आला नव्हता. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मंदिराचे
गाभार्यात प्रवेश करून भिंतीवरील नक्षीकाम केलेल्या चांदीचा पत्रा काढून नेला. मंदिरात असणार्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये चोरटा कैद झाला आहे. या चांदीच्या पत्र्याची अंदाजे किंमत 24 लाख रुपये आहे. श्री दत्त मंदिरातील पुजारी व गुरव प्रभाकर रघूनाथ आगलावे यांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात रेवदंडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …