आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक व सर्वसमावेशक कार्यप्रणालीकडे आकर्षित होऊन जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत माथेरानमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी शिंदे, सीमा कदम, जयश्री कदम, मेघा कोतवाल, चैतन्य शिंदे, रमेश कदम यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
पनवेलजवळील आसूडगाव येथील बॅक्वेट हॉलमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, युवा नेते दशरथ म्हात्रे, किरण ठाकरे, प्रवीण सकपाळ, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, किरण चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत शेळके, सुभाष भोसले, राजेश चौधरी, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, संतोष कदम, संदीप कदम आदी उपस्थित होते.