Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात भरघोस मतदान

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 18) तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. मतदानप्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारी केली होती, तर पोलिसांकडूनही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, एक हजार 429 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी भरघोस मतदान झाले.
ग्रामीण भागाचे भवितव्य घडविणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता मतदारांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. दुपारी गर्दी ओसरली, पण सायंकाळी पुन्हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. 20) जाहीर होणार आहे. तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया होईल.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply