Breaking News

आगीच्या ज्वालांनी होरपळले पक्षुपक्षी

उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील डोंगराळ परिसरात आगी लागल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा आगीच्या आगडोंबात पक्षुपक्षी होरपळून मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे वन विभागाकडून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. या वनक्षेत्रातील झाडे – झूडपे आणि गवताच्या आधारावर संचार करणारे पक्षुपक्षी, वन प्राणी यांचे संरक्षण व जतन करण्याचे काम वन विभागाचे आहे. त्यातच उरण परिसरातील वनांत रात्री अपरात्री आगी लागल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.अशा आगीच्या भक्ष्यस्थानी वनातील पक्षुपक्षी, वन प्राणी होरपळून मृत्यू मुखी पडत असल्याचे भयानक दृश्य पाहावयास मिळत आहे.त्यामुळे जनमानसात, प्राणी मित्रात संतापाची लाट उसळत आहे.संबंधित प्रशासनाने उरण तालुक्यातील आगीच्या घटनांची दखल घेण्यासाठी जातीने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी पक्षी प्रेमी करत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply