पनवेल : राज्य क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा कार्यालय आणि पनवेल महापालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धा खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालय या ठिकाणी झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.
स्पर्धेत रोहित मालविया, ओम पिसाळ, प्रणव वाडकर, सुशिल विकी, दिक्षा वलवे, श्रृती बोने, क्रिपाश्री शेट्टी, श्रावणी म्हात्रे, सोयल सय्यद यांनी सुवर्ण, तर जयशंकर व तनिषा मंडा यांनी रौप्यपदक पटकाविले. यापैकी सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, स्वाती पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले
बिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपट पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह …