Breaking News

पनवेलमध्ये रासपचा कोकण विभागीय मेळावा

आमदार महादेव जानकर यांचे होणार मार्गदर्शन
नवी मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा मंगळवारी (दि. 21) दुपारी 2 वाजता पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या संख्येने कोकण विभागातील रासप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रासपचे कोकण विभागीय अध्यक्ष भगवान ढेबे, रायगड महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ठाकूर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत यांनी केले आहे
या मेळाव्यात माजी मंत्री आमदार महादेव जानकर हे कोकणातील कार्यकर्त्यांशी मेळावा घेऊन संवाद साधणार आहेत. या कोकण विभागीय मेळाव्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसगर, राष्ट्रीय सरचिटणीस कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते व महाराष्ट्र मुख्य महासचिव, ज्ञानेश्वर माऊली सलगर व महाराष्ट्रातून इतर वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.पनवेल येथील कार्यकर्ता मेळाव्यात आमदार महादेव जानकर कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहेत, तर आगामी काळात येणार्‍या निवडणूका आणि पक्षाची ध्येयधोरणे या विषयावर कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहस्थ. त्यामुळे या मेळाव्याला पालघर ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रासप रायगड महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ठाकूर यांनी केले आहे,

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply