धाटाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्लात भाजपने सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. रोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 18) पनवेल येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का मानला जात आहे.
गेला अनेक दिवसांपासून रोहा नगरपालिकेतील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची रायगड जिल्ह्यात चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देत अखेर माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जितेंद्र दिवेकर यांचा रोह्यात दांडगा जनसंपर्क आहे. जनतेच्या हाकेला धावणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे आगामी रोहा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिवेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे रोह्यात भाजपला मोठी ताकद मिळणार आहे.
रोहा तालुका भाजप अध्यक्ष सोपान जांभेकर, दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आमित घाग, कामगार नेते जितेंद्र घरत, सोशल मीडिया संयोजक अमर वारंगे यांसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …