Breaking News

जागतिक बँकेचे पथक महाडमध्ये दाखल

महाड, पोलादपूर : प्रतिनिधी

जागतिक बँक अर्थ सहाय्यित जलस्वराज्य कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील निमशहरी व पाणी टंचाईग्रस्त भागात राबविला जात आहे. त्यातून महाड व पोलादपूर तालुक्यात काही टंचाईग्रस्त गावातील पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी नातोंडी धारेचीवाडी (ता. महाड) आणि वाकण मुरावाडी (ता. पोलादपूर) या गावांना जागतिक बँकेच्या पथकाने नुकतीच भेट दिली. व तेथील ग्रामस्थ, महिला यांच्याबरोबर या पथकातील सदस्यांनी संवाद साधला.

 पोलादपूरचे गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी यांनी यावेळी जागतिक बँकेच्या पथकाला तालुक्यातील पाणी योजनांचा आढावा  सादर केला. जागतिक बँक पथकाने सर्वात जास्त योजना पूर्ण केल्याबद्दल गटविकास अधिकारी डॉ. जोशी व तालुक्यातील सर्व पदाधिकार्‍यांचे कौतुक केले. यावर्षी देखील नवीन 49 प्रस्ताव शासनाला सादर करून पोलादपूर तालुका टँकरमुक्त करण्याचे ध्येय असल्याचे डॉ. जोशी यांनी जागतिक बँकेला सांगितले. या कामांना निधी देणे आमचे कर्तव्य आहे, असे जागतिक बँकेचे टीम लीडर राघवा यांनी यावेळी सांगितले.

महाड तालुक्यातील नातोंडी धारेचीवाडी व वाकण मुरावाडी येथे जागतिक बँक पथकाने ग्रामस्थ, महिला यांच्याबरोबर चर्चा केली. उन्हाळयामध्ये मुलांना महिलांना दूरवरून पाणी आणण्याचा त्रास दूर झाल्यामुळे महिला समाधानी असल्याचे दिसून आले. धारेचीवाडी येथील महिलांना पाणी आणण्यासाठी रात्रभर जागावे लागत होते. मात्र पाणी योजना राबविल्याने हा त्रास बंद झाल्याने येथील महिला व ग्रामस्थांनी जागतिक बँकेचे आभार मानले.

या पथकाचे प्रमुख राघवा, सदस्य मूर्ती, मरीअप्पा कुलाप्पा, निर्मला चोप्रा, पाणी पुरवठा विभागाचे रहमान, राहुल ब्राम्हणकर, मंगेश भालेराव (मंत्रालय, मुंबई), उपअभियंता प्रशांत म्हात्रे, वसंत राठोड, तुषार राठोड, सेवा संस्थेचे जगन्नाथ साळुंके यांच्यासह पोलादपूर पंचायत समितीचे विस्तारअधिकारी, ग्रामसेविका, कंत्राटदार, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ आणि नातोंडीला महाड ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पाटील व ग्रामलेखा मंगेश साळुंके तसेच धारेची वाडीतील ग्रामस्थ व कंत्राटदार उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply