Monday , June 5 2023
Breaking News

नवीन पनवेलमध्ये अज्ञाताकडून रात्री कचरा जाळण्याचा प्रकार

पनवेल : वार्ताहर

नवीन पनवेल परिसरात साठलेला कचरा अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळेस जाळला जात असल्याने त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तरी अशा व्यक्तींविरूद्ध कारवाईची मागणी नवीन पनवेलमधील स्थानिक रहिवासी करीत आहेत. नवीन पनवेल येथील परिसरातील अनेक होर्डिंग पाँड येथे फेरीवाले तसेच काही परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. हा कचरा सिडको व महापालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी उचलला जातो व परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो, मात्र काही जण हा जमलेला कचरा रात्रीच्या वेळी जाळत असल्याने हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते व दुर्गंधी सुद्धा सुटते. कचरा जाळण्यास बंदी असतानाही हा प्रकार केला जातो. तरी अशा व्यक्तींविरूद्ध संबंधित विभागाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply