Breaking News

वडघर गावातील विकासाचा वेग वाढला

  • भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे प्रतिपादन

  • आमदार महेश बालदी यांच्या विकासनिधीतून रस्त्याचे भूमिपूजन

उरण ः रामप्रहर वृत्त

उरण तालुक्याला आमदार महेश बालदी यांच्यासारखे नेतृत्व मिळाल्यामुळे आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले. वडघर गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 10 लाख रुपये मंजूर झाले. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 3) करण्यात आले. उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्या अंतर्गत त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून वडघर गावातील बिलालशेख यांच्या घरापासून ते कान्हाशेठ ठाकूर यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. या विकासकामाच्या भूमिपूजनावेळी शाम घरत, शशिकांत धुमाळ, भाजप महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा समिना साठी, मोहम्मद साठी, गाव अध्यक्ष अनवर राऊत, रजाक रासलकर, मजीद निगुटकर, वसीम सय्यद, अबिदा शेख, खतिजा खान, अमीन खान, अजमद दिवान, जाखीर पठाण, अली खान, फिरोज सैय्यद ठेकेदार मयूर ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply