Breaking News

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच

खानावळे माजी सरपंचांसह कार्यकर्ते दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत खानावळे माजी सरपंच अनंता पांडुरंग शिंदे यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
अनंता पांडुरंग शिंदे यांच्यासमवेत ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू लक्ष्मण शिंदे, युवा कार्यकर्ते अमीर गोपीनाथ जंगम, प्रताप विष्णू शिंदे, जीवन रामचंद्र कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात आमदार महेश बालदी यांनी अनंता पांडुरंग शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.
या वेळी गुळसुंदे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र बांडे, गुळसुंदे ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, वावेघर ग्राम पंचायत सदस्य जगन्नाथ चव्हाण, भाजप तुराडे गाव अध्यक्ष प्रतीक भोईर, घोसाळवाडी बूथ कमिटी अध्यक्ष दिनेश सुर्वे, युवा कार्यकर्ते काशिनाथ तांबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply