Breaking News

मनाला स्थिर ठेवण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक -आमदार प्रशांत ठाकूर

तळोजामध्ये रंगली भव्य भजन स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त
भटकत राहणार्‍या मनाला जर आपल्याला कुठेतरी स्थिर ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी अध्यात्माची जोड ही आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये असलेली भजनाची परंपरा हि आपल्या पुढच्या पिढ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणारी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भजन स्पर्धेवेळी केले. प्रभात पर्व फाऊंडेशनच्या वतीने भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत भजन स्पर्धेचा आस्वाद घेतला. पनवेल तालुक्यातील तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल येथे हि भजन स्पर्धा रविवारी (दि. 19) झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणार्‍या स्पर्धकास 22,222 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकविणार्‍या स्पर्धकास 12,222 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांक पटकविणार्‍या स्पर्धकास 7,777 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या वेळी भजनसम्राट हभप निवृत्तीबुवा चौधरी, महादेवबुवा शहाबाजकार, बी. के. राजे, सागर राजे यांच्यासह स्पर्धक व भजनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply