आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्रीवर्धन तालुक्यातील दाडंगुरी गावचे ग्रामस्थ आणि सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात वास्तव्यास असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
या वेळी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतोष सावंत, गजानन गोळे, विलास शेलार, सुनील पवार, संतोष कदम, राजेंद्र धांदरुत, मोहन धांदरुत, साहिल धांदरुत, योगेश सावंत, नितीन सावंत, प्रज्योत पाटील, सुधाकर शेलार, किरण पाटील, स्वराज पाटील यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे पक्षाची शाल देऊन आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवरांनी भाजपमध्ये स्वागत केले.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष आदेश पाटील, वाळवटी पं. स. विभाग अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होेते.