Breaking News

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल तालुक्यातील 14 रस्त्यांच्या विकासकामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जवळपास 50 कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे.
यानुसार प्रजिमा 13 ते चिंचवली तर्फे तळोजा, शिरवली, वांगणी तर्फे तळोजा रस्ता, राज्य मार्ग 103 ते वाजे, चेरवली वाजापूर पिंपळवाडी रस्ता, राज्य मार्ग 13 ते शांतीवन, भानघर, चिंचवली तर्फे वाजे रस्ता, वावंजे ते मानपाडा रस्ता, इजिमा 21 ते नितळस रस्ता, वाजे ते बकुळवाडी रस्ता, राज्य मार्ग 85 ते कानपोली रस्ता, राज्य मार्ग 103 ते खुटल्याचा पाडा (नेरेपाडा) रस्ता, राज्य मार्ग 85 ते हेदुटणे रस्ता, राज्य मार्ग 103 ते सांगटोली रस्ता, राज्य मार्ग 103 ते धोदाणी रस्ता, राज्य मार्ग 103 ते बोनशेत रस्ता, धोदाणी ते चिंचवाडी रस्ता, राज्य मार्ग 103 ते भोकरपाडा रस्ता या सर्व रस्त्यांचा विकास होणार आहे. या रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यांची मागणी आणि पाठपुराव्याने 50 कोटी रुपयांच्या या कामांना ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लवकरच या कामांची निविदा प्रसिद्ध होऊन या रस्त्यांच्या विकासकामाला सुरुवात होणार आहे.
पनवेल तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply