Breaking News

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये विकासकामांचा झंझावात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध होत असून विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 25ः15 निधीतून सुमारे 78 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 3) करण्यात आला.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने नागरिकांना सुविधा देण्यासाठी विकासकामांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार त्यांच्या 25ः15 या आमदार निधीतून शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील आंबे गावात अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण (10 लाख रुपये), चिंचवली गावात गटार बांधकाम आणि रस्ता काँक्रीटीकरण (10 लाख रुपये), चिंचवली अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण (10 लाख रुपये), शिरवलीतील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण (10 लाख रुपये), शिरवली येथील यशवंत पाटील ते कमलाकर भोईर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण (आठ लाख रुपये), खानावमधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण (20 लाख रुपये) आणि महालुंगी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण (10 लाख रुपये) करण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांना भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, मयुर कदम, सुनील पाटील, शिरवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तुकाराम पाटील, खानाव ग्रामपंचायत सरपंच निलम आरिवले, उपसरपंच बाळाराम पाटील, सदस्य हरिश्चंद्र गोंधळी, चिंध्रण पंचायत समिती विभागीय अध्यक्ष पांडुरंग पाटील, भगवान खानावकर, राम पाटील, भास्कर उलवेकर, हिरा निरगुडा, तुकाराम उघडा, एकनाथ रंधवी, रेश्मा पाटील, रेखा पाटील, वैशाली रंधवी, गिरीजा रंधवी, परशुराम रिकामे, लहू मुंडे, शिवाजी ठोंबरे, फुलचंद पाटील, दीपक रिकामे, संतोष मुंडे, कृष्णा बोलाडे, मच्छिंद्र खाने, दीपक बोंडे, गुरू ठोंबरे, गोटीराम रिकामे, ऋतिक मुंढे, राहुल रिकामे, परशुराम रिकामे, शिवाजी ठोंबरे, महेंद्र खाने, बूथ क्रमांक 40चे अध्यक्ष मनोहर अरिवले, युवा कार्यकर्ता उमेश बडेकर, भूषण फराड, गणेश वाघे, दिलीप वाघे, राजू गोंधळी, माणिक बोलाडे, वंदना तवले, मंदा बोलाडे, संध्या बोलाडे, सुमन पाटील, अलका खाने, शानू तवले, छाया बोलाडे, तानाजी अरिवले, ज्येेष्ठ नागरिक बाळाराम पाटील, शशिकांत दिसले, बाळाराम पाटील, दत्तात्रेय वारदे, अनिल फराड, हरिश्चंद्र वारदे, रवी पाटील, प्रशांत बोलाडे, गणेश भाग्यवंत, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply