Breaking News

उरण येथे रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

उरण ः प्रतिनिधी
आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने उरण नगर परिषदेमार्फत पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण आणि नवीन विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 1) दुपारी 3 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा उरण येथील महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नारायण (नानासाहेब) विष्णू धर्माधिकारी नगर परिषद मराठी शाळा, पेन्शनर्स पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उद्योग व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे; विशेष अतिथी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; तर प्रमुख उपस्थिती आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांची लाभणार आहे.
या वेळी 11 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले उरण नगर परिषद प्रशासकीय भवन, 4.35 कोटी खर्चाचे सावित्रीबाई फुले फुल मार्केट, 4.10 कोटी खर्चाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि समाज विकास केंद्र, दोन कोटी 53 लाख खर्चाचे चारफाटा मच्छीमार्केट यांचे लोकार्पण तसेच उरण येथे 82.54 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार्‍या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. आमदार महेश बालदी यांच्या विशेष सहकार्याने होत असलेल्या या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक समीर जाधव यांनी केले आहे.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply