Breaking News

सामाजिक कार्यकर्ते रूपेश धुमाळ समर्थकांसह भाजपमध्ये

उरण ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश धुमाळ यांनी समर्थकांसह रविवारी (दि. 1) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
उरण भाजपच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, राकेश गायकवाड, लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, एस.के. नाईक, चंद्रकांत घरत आदी उपस्थित होते.
या वेळी रूपेश धुमाळ, जितेंद्र पाटील, शैलेश पाटील, प्रकाश घरत, विक्रम पवार, जितेंद्र पाटील, रूपेश पाटील, कुणाल नाईक, रोहित कोळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply