पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने साकारण्यात आलेल्या वाहनतळाचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 6) झाले. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहराचे स्वरूप हे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या विकासकामांमुळे बदलत चालले आहे, असे प्रतिपादन केले.
पनवेल महापलिकेसह संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना भेडसवणार्या समस्या सोडवून त्यांना विकासकामांच्या माध्यामतून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम होत आहे. पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. ऐन सणासुदीच्या काळात होणार्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकारातून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील भूखंडावर महापालिकेच्या वतीने एक कोटी 25 लाख 99 हजार 645 रुपये खर्चून वाहनतळ उभारण्यात आला आहे. या वाहनतळाचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, संजय भगत, अमित ओझे, केदार भगत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, मयुरेश खिस्मतराव, अंजली इनामदार, देवांशु प्रभाळे आदी उपस्थित होते.
Check Also
खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …