Breaking News

कर्नाळा गावातील अंतर्गत रस्ते कामाला सुरुवात

भाजप पदाधिकारी व गावकर्‍याच्या उपस्थित भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कर्नाळा गावामध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला भाजप पदाधिकारी व गावकरी यांच्या उपस्थित सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. 13) माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत याच्या हस्ते रस्ते कामाचे भूमिपूजन झाले.
या वेळी ज्ञानेश्वर घरत म्हणाले की, या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी जिल्हा परिषदेच्या 15वा वित्त आयोग अंतर्गत चार लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. निधी येईपर्यंत माझा कार्यकाळ संपला आणि निधी मिळाला नाही. यानंतर कर्नाळा ग्रामपंचायतीमधील भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी व मी आमदार महेश बालदी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याअनुशंगाने आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाची पूर्तता होतेय. कॉन्ट्रॅक्टर धीरज यांनी सांगितल्याप्रमाणे या रस्ते कामाला तीन दिवसांत सुरुवात होईल. त्यानुसार आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, यासोबतच मंदिराच्या सभामंडपासाठीही आमदार महेश बालदी यांच्याकडे पाठपुरावा करू, ग्रामपंचायत निवडणूकीच्या वेळेस गावासाठी पाण्याची लाईन टाकण्यात आली. स्मशानभूमी, हायमास्ट, शेडसाठीही भाजप पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा करून कामे करवून घेतली आहेत. येथील पूनर्वसनाचाही प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला कर्नाळा ग्रामपंचायतीमधील भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते यामध्ये पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, कर्नाळा विभागीय भाजप अध्यक्ष बाळूशेठ पाटील, भाजप नेते गणेश पाटील, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू पाटील, केळवणे पंचायत समिती भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष सुशील घरत, भाजप गाव अध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजपा कार्यकर्ते हरेश्वर पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील मुरलीधर पाटील, संदीप पाटील, राजेश रसाळ, प्रशांत म्हात्रे , निलेश पाटील, करण पाटील, संदीप पाटील, केळवणे भाजपा कार्यकर्ता विलास ठाकूर आदींसह महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply