Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भाजप पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल शहर मंडल कार्यकारिणी बैठक भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहराध्यक्ष अनिल भगत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 9) झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, उपाध्यक्ष कविता चौतमोल, चिटणीस ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, नीता माळी, महिला मोर्चा पनवेल मंडल अध्यक्ष राजश्री वावेकर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले की, सगळ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे, तर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी, संघटनेसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे, असे आवाहन केले.
या वेळी उद्योजिका रिया प्रितम म्हात्रे यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने उटण्याचे वाटप करण्यात आले.
सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात 2023मध्ये जन्मलेल्या एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी स्वखर्चाने एक हजार रुपये भरून या बालिकांचे नवीन खाते उघडले. या उपक्रमाचा लाभ घेतलेल्यांना या वेळी सुकन्या योजनेचे पासबुक तसेच खेळण्याचे वाटप करण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply