भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा शनिवारी सत्कार समारंभ

मंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये होणार्‍या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष अनिल भगत, उरण तालुका मंडल अध्यक्ष रवी भोईर, शहर मंडल अध्यक्ष कौशिक शाह, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, खालापूर मंडल तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply