पनवेल ः रामप्रहर वृत्त : पनवेल मिरची गल्ली येथील पोेतदार ज्वेलर्सचे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. आज लाचलुचपत खात्याचे उपअधीक्षक रमेश चव्हाण यांनी पोतदार ज्वेलर्सला सदिच्छा भेट दिली. या सदिच्छापर भेटीत बोलताना उपअधीक्षक रमेश चव्हाण म्हणाले की, मराठी उद्योजकाने सुवर्ण क्षेत्रात पाऊल टाकणे हे अतिशय गौरवास्पद आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या व्यवसायात यशाचे शिखर गाठणे हे अतिशय सोपे आहे. कु. अमित पोतदार व कु. आदेश पोतदार हे सोनार समाजाचे असल्याने सुवर्ण क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर पोतदार ज्वेलर्सचे नाव ते नक्कीच मोठे करतील, असा आत्मविश्वास रमेश चव्हाण यांनी व्यक्त केला. या वेळी कु. अमित पोतदार व कु. आदेश पोतदार यांना रमेश चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी लाचलुचपत खात्याचे रमेश चव्हाण यांचे लिपीक संतोष ताम्हणेकर, तसेच पत्रकार अरविंद पोतदार, पत्रकार राकेश पितळे, प्रतिक वेदपाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …