Breaking News

राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा शिवसैनिकांकडून समाचार

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका कामासंदर्भात निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात ‘मरू द्या मुख्यमंत्री’ असे भरणे यांनी म्हटले, मात्र शिवसैनिकांचा रोष पाहता दत्तात्रेय भरणे यांनीदेखील तत्काळ दिलगिरी व्यक्त केली. सोलापूर महानगरपालिकेतर्फे रविवारी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 20 हजार वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी उपस्थित नगरसेवकांनी या अभियानासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तेव्हा मनोगताच्या वेळी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. भरणे यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांना निधी उपलब्ध करून द्यायचा का, असा सवाल केला. तेव्हा महापौर यन्नम यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागू या, असे उत्तर दिले. तेव्हा बोलण्याच्या ओघात भरणे यांनी ‘मुख्यमंत्री मरू द्या. आपले आपण करू. मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी मागू’ असे वक्तव्य केले. पालकमंत्र्यांनी ओघात केलेल्या वक्तव्याचा मात्र शिवसेनेकडून खरपूस समाचार घेतला जातोय. सोलापुरातील शिवसेनेच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. तेव्हा दत्तात्रेय भरणे यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे ग्रामस्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Leave a Reply