Breaking News

मराठी उद्योजकाचे सुवर्ण क्षेत्रात पाऊल हे गौरवास्पद -रमेश चव्हाण

पनवेल ः रामप्रहर वृत्त  : पनवेल मिरची गल्ली येथील पोेतदार ज्वेलर्सचे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. आज लाचलुचपत खात्याचे उपअधीक्षक रमेश चव्हाण यांनी पोतदार ज्वेलर्सला सदिच्छा भेट दिली. या सदिच्छापर भेटीत बोलताना उपअधीक्षक रमेश चव्हाण म्हणाले की, मराठी उद्योजकाने सुवर्ण क्षेत्रात पाऊल टाकणे हे अतिशय गौरवास्पद आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या व्यवसायात यशाचे शिखर गाठणे हे अतिशय सोपे आहे. कु. अमित पोतदार व कु. आदेश पोतदार हे सोनार समाजाचे असल्याने सुवर्ण क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर पोतदार ज्वेलर्सचे नाव ते नक्कीच मोठे करतील, असा आत्मविश्वास रमेश चव्हाण यांनी व्यक्त केला. या वेळी कु. अमित पोतदार व कु. आदेश पोतदार यांना रमेश चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी लाचलुचपत खात्याचे रमेश चव्हाण यांचे लिपीक संतोष ताम्हणेकर, तसेच पत्रकार अरविंद पोतदार, पत्रकार राकेश पितळे, प्रतिक वेदपाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply