Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वडघर येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल, उरण मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या अल्पसंख्याक विकास निधीतून वडघर येथील कब्रस्तानला संरक्षण भिंत बांधण्याचे काम 35 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 17) करण्यात आले.
कुटुंबप्रमुख म्हणून विकासकामांसाठी निधी कुठून आणायचा याची जबाबदारी माझी असून काम करून घेण्याची जबाबदारी तुमची असल्याची प्रतिक्रिया या वेळी आमदार महेश बालदी यांनी दिली.
भूमिपूजन कार्यक्रमास कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, कर्णा शेलार, भाजपचे वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, माजी ग्रामपंचायत सदस्य बशीर खान, समिना साठी, रज्जाक रासलकर, वडघर मुस्लीम मोहल्याचे अध्यक्ष अनवर राऊत, दिलकश पटेल, वडघर रमाबाई नगर अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, माजी अध्यक्ष भरत सोनावणे, महम्मद साठी, गजानन पाटील, मजीद निंगुडकर, अनंता कांबळे, प्रगट कडू यांच्यासह वडघरमधील ग्रामस्थ आणि मुस्लीम बांधव उपस्थित होते. या वेळी महेश बालदी यांनी आगामी काळातही अशाच प्रकारे विकासाची कामे होणार असल्याचे सांगून संरक्षण भिंतीच्या कामासाठी पाठपुरावा करणार्‍या बशीर खान यांचे कौतुक केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply