Breaking News

कामगार नेते रवी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे कामगार नेते रवी नाईक यांचा वाढदिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करून मंगळवारी (दि. 18) साजरा झाला. या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुमारे 700 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि वंदे मातरम रिक्ष-टॅक्सी संघटनेच्या वतीने नवीन पनवेल येथील के.आ. बांठिया शाळेत विद्यार्थी, पालक आणि परिसरातील रहिवाशांसाठी कामगार नेते रवी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डोळ्यांची तपासणी, हृदयाची तपासणी, कॅन्सर तपासणी, दातांची तपासणी, शुगर तपासणी, बोन मिनरल डेन्सीटी तपासणी करून आवश्यक तो सल्ला देण्यात आला तसेच मोफत चष्मे आणि औषधांचे वाटप करण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटन समारंभास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह माजी नगरसेवक नितीन पाटील, बांठिया शाळचे प्राचार्य माळी, रोटरी क्लबचे डॉ. दीपक खोत, सुधीर चकोळे, कोप्रोलीचे माजी सरपंच रमेश पाटील, भाजप नेते अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, माजी नगरसेविका वर्षा नाईक, बारापाडा बूथ अध्यक्ष उमेश पाटील, दिलीप गावंड, शैलेश पाटणे, सचिन टाकले, उमेश पाटील, जे.एन. पाटील, शैलेश पाटील, प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते.
या वेळी कामगार नेते रवी नाईक यांनी येत्या 23 तारखेला लोकनेते दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रिक्षा आणि टॅक्सीचालकांसह त्यांच्या परिवारासाठी पनवेल मार्केट यार्ड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply