उलवे नोड : रामप्रहर वृत्त
सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करा. ग्रेसवेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणारा प्रत्येक रुग्ण हा तंदुरुस्त होऊनच बाहेर पडेल, अशा शुभेच्छा माजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी केले तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईपर्यंत संपूर्ण ताकदीनिशी पाठपुरावा करीन, अशी ग्वाही दिली, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही खोपकर कुटुंबीयांचे अभिनंदन करून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
उलवे नोड सेक्टर 17मध्ये नव्याने ग्रेसवेल हॉस्पिटल सुरू झाले आहे. हे हॉस्पिटल माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे अतिरिक्त खासगी सचिव प्रकाश खोपकर यांचा मुलगा डॉ. तेजस खोपकर आणि सून डॉ. पूर्वा खोपकर यांनी सुरू केले आहे. या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा नवी मुंबई डॉक्टर खोपकर सोशल फाऊंडेशन, डॉक्टर खोपकर स्पेशालिटी क्लिनिक आणि जिजामाता हॉस्पिटलच्या वतीने गुरुवारी (दि. 27) आयोजित करण्यात आला होता.
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. या समारंभास महाडचे आमदार भरत गोगावले, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योजक जे.एम.म्हात्रे, जेष्ठ नेते वाय.टी.देशमुख, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, उलवे नोेड महिला मोर्चा अध्यक्ष योगिता भगत, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, हेमंत ठाकूर, निलेश खारकर, जयवंत देशमुख, शिवसेना उरण विधानसभा प्रमुख मनोज घरत, काँग्रेसचेे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी जि.प. सदस्य रविशेठ पाटील, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, उद्योजक रतनशेठ भगत, सुभाष केकाणे, अपोलो हॉस्पिटलचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ संजीवकुमार काळकेकर, सिनियर फिजिशियन गणेश पिंपळे, प्रकाश खोपकर, हॉस्पिटलचे एमडी डॉ. तेजस खोपकर, डॉ. पूर्वा खोपकर, प्रणव खोपकर यांच्यासह पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …