Breaking News

सुधागडातील भातशेतीचे नुकसान

तहसीलदारांनी केली पाहणी; पंचनामे करण्यासाठी यंत्रणा सरसावली

पाली : प्रतिनिधी

ऐन कापणीच्या तोंडावर कोसळलेल्या परतीच्या पावसाने  सुधागड तालुक्यात सुमारे 3300 हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असल्याचे सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले. तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी शनिवारी (दि. 2) सुधागड तालुक्यातील बलाप, उध्दरसह अन्य भागातील भातशेतीची पाहणी केली व शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सुधागड तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा कामाला लागली असल्याचे तहसीलदार रायन्नावार यांनी सांगितले. अतिवृष्टीने आणि परतीच्या पावसाने उभे पीक शेतात आडवे झाले, तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतातूर व व्याकूळ झाला आहे. भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

प्राथमिक अहवालानुसार सुधागड तालुक्यात सुमारे 75 टक्के भातशेतीचे नुकसान झाले असून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करीत आहे. शेतकर्‍यांनीही प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply