Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोफत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष उलवे नोड 2 आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवारी (दि. 28) रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी साहित्य वितरण करण्याचे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे तृतीय दशक चालू आहे. गव्हाण पंचक्रोशीतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित करण्याच्या कार्यक्रमांतर्गत भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीअखेरच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वह्यांचे वितरण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या देणगीतून मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. अगदी परदेशी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करण्यात येते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या उत्तम उत्तुंग निकालाची परंपरा कायम राखत अधिकाधिक गुणवंत व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ कोळी यांचे समायोजित भाषण झाले.
या वेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला.
या समारंभास माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील, जयवंत देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, हेमंत ठाकूर, वामन म्हात्रे, रघुनाथ देशमुख, सुहास भगत, अनिल कोळी, सुजाता पाटील, जयश्री घरत, स्नेहलता ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर तथा जनरल बॉडी सदस्य प्रमोद कोळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक गोवर्धन गोडगे, उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर तथा जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हात्रे व एकनाथ ठाकूर, प्रशांत परदेशी, चारुशीला ठाकूर, हर्षला पाटील, शितलकुमार म्हात्रे, गणेश भोईर व अन्य सेवक तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर यांनी केले. सूत्रसंचालन सागरकुमार रंधवे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक गोवर्धन गोडगे यांनी मानले.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply