Breaking News

लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

पनवेल : प्रतिनिधी
समाजाला प्रगतिशील बनवायचेअसेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून, हे शिक्षण मोफत व दर्जेदार मिळवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. आज महाराष्ट्रामध्ये शेकडोहून अधिक शाळा रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७वी जयंती उत्साहात पार पडली. या कार्यक्रमास कामोठे पोलीस ठाणेचे वरिष्ठ निरीक्षक अजय कांबळे, तायडे, प्रमुख वक्ते आगरी शिक्षण संस्था पनवेलचे मुख्याध्यापक पंकज भगत, विद्यालयाचे चेअरमन जयदास गोवारी, हभप गोवारी विद्यालयाचे संस्थापक सूरदास गोवारी, माजी व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विश्वनाथ गोवारी, विनोद गोवारी, नारायण पोपेटा, महेंद्र गायकर आदी मान्यवर उपस्थित.
विद्यार्थी मनोगतात पाचवीमधून करण केदार, नववीमधून सोनाक्षी राजभर या विद्यार्थ्यांनी कर्मवीरांविषयी विचार व्यक्त केले. अजय कांबळे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर व आपली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते पंकज भगत यांनी कर्मवीर अण्णांच्या संघटन, चिकाटी व मेहनत या गुणांची ओळख विविध प्रसंगांमधून विद्यार्थ्यांसमोर मांडली तसेच आजचा विद्यार्थी कसा असावा यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक एम.डी. गावंड यांनी केले. निवेदन थोरात मॅडम व पेरवी सर यांनी केले. व्ही. व्ही. फडतरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply