Breaking News

पनवेल महापालिका हद्दीत आजपासून अत्यावश्यक सुविधांच्या दुकानांवर निर्बंध

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिका हद्दीत आज मंगळवार (दि. 7) पासून लॉकडाऊन कडक करण्यात येणार असून औषधे व वैद्यकीय सेवा सोडून सर्व अत्यावश्यक सुविधांच्या दुकानावर निर्बंध लावण्यात आले आहेत.
पनवेल महापालिका हद्दीत 3 जुलैपासून 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला असताना अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंगळवार 6 जुलै मध्यरात्रीपासून औषधे व वैद्यकीय सेवा सोडून सर्व अत्यावश्यक सुविधांच्या दुकानावर पुढीलप्रमाणे  निर्बंध लावण्यात आले आहेत.
यामध्ये अन्नधान्य, भाजीपाला, अंडी, फळे, बेकरी, दूध, मासळी, चिकन, मटण व इतर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत देता येईल. दूध डेअरी आस्थापना सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. औषधाची दुकाने (फक्त औषध विकण्याची मुभा) सकाळी 9 ते रात्री 9 सोशल डिस्टन्सिंग पाळून रुग्णालयातील औषध दुकाने 24 तास किंवा त्यांच्या सोयीनुसार 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी असलेली दुकाने 24 तास सुरू राहतील. पिठाची गिरणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. रेस्टॉरन्ट व किचन (फक्त पार्सल सेवा) सकाळी 10 ते रात्री 1 वाजेपर्यंत राहील.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply