आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण
मोहोपाडा : प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत रसायनी विभागात तब्बल 21 कोटींच्या विकासकामे होणार आहेत. यातील एक कोटी 40 लाखांचे काम वगळता सर्व कामांचा शुभारंभ शनिवारी (दि.5) सायंकाळी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला.
लोधिवली विभाग, दुर्गामाता कॉलनी, गणेशनगर, कांबे, चांभार्ली, शिवनगर, मोहोपाडा आदी वासांबे ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे भूमीपुजन व वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी फंड अंतर्गंत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा झाला.
रस्ते काँक्रीटीकरण, गाव सभा मंडप, स्मशानभूमी, संरक्षण भिंत, उद्यान विकसित करणे, गटारांचे काँक्रीटीकरण, तलाव सुशोभिकरण, सामाजिक सभागृह बांधणे अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. दरम्यान, यापैकी एक कोटी 40 लाख निधींच्या कामाचा शुभारंभ आचारसंहितेपूर्वी होणार आहे.
उरण विधानसभा मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय असून यापुढेही या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी हजारो कोटी रुपयांचा विकास निधी केंद्र व व महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून आणून उरण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करेन, असे आमदार महेश बालदी यांनी मोहोपाडा ग्रामपंचायत सभागृहात सांगितले.
या वेळी तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, वासांबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, सरपंच उमा मुंढे, उपसरपंच भुषण पारंगे, सदस्य उपस्थित होते.