Breaking News

जांभिवली, चावणे हद्दीत विकासकामांचे लोकार्पण, अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

पाच वर्षांत केलेल्या कामाचे समाधान -आमदार महेश बालदी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली याचे मला समाधान आहे. येत्या निवडणुकीतही तुमचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्या. जे काम केलंय त्यापेक्षा दुप्पट काम करून दाखवेन, अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला.
उरण मतदारसंघातील जांभिवली आणि चावणे गु्रप ग्रामपंचायत हद्दीमध्ये आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा जांभिवली येथील जिल्हा परिषद शाळेत रविवारी (दि. 13) झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार महेश बालदी यांच्या दमदार नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे आमदारमहोदयांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास भाजप जिल्हा चिटणीस माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, केळवणे जि.प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जांभिवलीच्या सरपंच रिया कोंडिलकर, सदस्य शेखर जाधव, राजेंद्र कोंडिलकर, संदीप कोंडिलकर, प्रकाश कोंडिलकर, संजय टेंभे, तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, कराडे खुर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकल, युवा मोर्चा उपाध्यक्ष दिनेश पाटील, गणेश पाटील, मदन खारके, नंदू गावंड, रामचंद्र मोकल, शेखर जाधव, राकेश घरत, संदीप गोडिवले, काशिनाथ गोडिवले, शंकर गोडिवले, प्रभाकर गोडिवले, ओमकार राऊत, प्रवीण गोडिवले, राजेश गोडिवले, अजित गोडिवले, अनिल बोंबाले, नितीन गोडिवले, पंकज गोडिवले, दीपक शिर्के, मिलिंद शिर्के, अशोक गोडिवले, समीर पाटील, शेखर कोरडे, पियुष जितगरे, मंगेश गावळे, सुनील गोडिवले, शंकर वाघ, पेमेंद्र गोडिवले, जितेंद्र जाधव, अमर गोडिवले, लक्ष्मण शिंदे, आकाश शिर्के, मिलिंद शिर्के आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मागच्या आमदारांनी काहीच काम केले नाही. त्यामुळे मला प्रत्येक घटकासाठी काम करण्याची संधी मिळाली. आदिवासीवाड्यांमध्ये रस्ता उपलब्ध करून देण्याचे भाग्य मिळाले असल्याचे उद्गार आमदार महेश बालदी यांनी काढले.
या वेळी जांभिवलीमधील शिवसेना उबाठा पक्षाचे उपशाखाप्रमुख समीर कोंडिलकर, माजी सदस्य मंदा टकले तसेच भाजपचे नागेश निरगुडा यांच्या नेतृत्वाखाली घेरा माणिकगडमधील नारायण निरगुडा, शुक्र्या वारगुडा, मंगळ्या वारगुडा, मोहन निरगुडा, महादू वारगुडा, मंगळ्या निरगुडा, किसन पाथांगे, गोविंद शिद, परशु निरगुडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply