Breaking News

पनवेलमध्ये रंगणार टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील लिलाव (ऑक्शन) सोहळा आमदार प्रशांत ठाकूर, रोटरी प्रांत 3131चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचे माजी अध्यक्ष विजय निगडे, पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी स्पर्धा असून या वर्षी स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा 10, 11, 12 व 17, 18, 19 जानेवारी 2025 या दिवशी खेळवली जाणार आहे. रायगड रोटरी वॉरियर्स स्पर्धेचे आयोजक असून स्पर्धेत रोटरी 3131 प्रांतातील 40 वर्षावरील 78 रोटरी सदस्य खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत. हे सदस्य सहा विविध संघात प्रत्येकी 13 खेळाडू या प्रमाणे आयपीएल धर्तीवर लिलाव (पैशांच्या ऐवजी पॉईंट्स) पद्धतीने निवडले जातात. स्पर्धेचे टीआयपीएल मुख्य प्रयोजक असून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व पनवेल सिटी हे सहप्रयोजक आहेत.
पनवेलजवळील पळस्पे फाटा येथील जय मल्हार हॉटेलच्या किनारा लॉनवर झालेल्या लिलाव सोहळ्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अशा प्रकारे क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल रोटरी क्लब व सर्व खेळाडूंचे कौतुक केले. आपापले व्यवसाय, समाजसेवा करून फिटनेसची काळजी घेत खेळाचे मैदान गाजवा, असे आवाहनही त्यांनी केले. माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांनी सर्व खेळाडूंनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिमाखदार खेळ करा, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
ऑक्शन सोहळा यशस्वी करण्यासाठी रोटरी रायगड वॉरियर्स संघांचे अध्यक्ष गणेश कडू, सचिव डॉ. संतोष जाधव, खजिनदार अतिश थोरात यांच्यासह सतिश देवकर, पंकज पाटील, देवेंद्र चौधरी, प्रितम कैय्या, सुदीप गायकवाड, ऋषी बुवा, अमित पुजारी, डॉ. आमोद दिवेकर, विकेश कांडपिळे, संतोष घोडिंदे, विनोद भोईर, आनंद माळी, पुष्कराज जोशी आदी सदस्यांनी मेहनत घेतली.
विविध संघ व त्यांचे कर्णधार
बीकेसी संघ ः मालक भाऊ कोकणे व कर्णधार अविनाश बारणे, प्राईम दादा संघ ः मालक दादा दिवटे व कर्णधार विजय कोतवाल, रिवेल विनर संघ ः मालक महेश घोरपडे व कर्णधार अरविंद चौहान, बाश्री संघ ः मालक प्रशांत (मामा) तुपे व कर्णधार सिकंदर पाटील, पिंपरी एलिट इगल संघ ः मालक चंदू पाटील व कर्णधार योगेश वाघ, आर.आर. फायटर्स संघ ः मालक राहुल टिळेकर व कर्णधार राहुल कामठे.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी …

Leave a Reply